महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विभागात जवळपास 800 कोटींचा महाघोटाळ्याची सखोल चौकशी करा-खासदार सौ नवनीत रवि राणा यांची केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांना प्रत्यक्ष भेटून मागणी
महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे आदिवासी शिशुना शासनातर्फे देण्यात येणारा पौष्टिक आहार व अन्य जरुरी वस्तू न मिळाल्यामुळे गेल्या 2/3 महिन्यात मेळघाटात 49 नवजात शिशुचा मृत्यू_खासदार सौ नवनीत रवी राणा यांची केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्री स्मृती इराणी यांचेकडे तक्रार
मा.उच्च न्यायालयाने ब्लॅक लिस्ट केलेल्या व महिला बालकल्याण विभागात पुरवठा किंवा कंत्राट घेण्यास मनाई केलेल्या समृद्धी व व्यंकटेश या कपन्यांना पळवाट शोधून ,मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करून कंझुमर फेडरेशन च्या माध्यमातून पुरवठा करण्याचे काम दिले गेले.-खासदार सौ नवनीत रवी राणा
राज्याच्या महिला व बालकल्याण विकासमंत्री श्रीमती यशोमती ठाकूर या अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री सुद्धा आहेत व त्यांच्याच गृह जिल्ह्यात इतक्या बालकांचा कुपोषणाने मृत्यू होणे ही गोष्ट अत्यंत खेदजनक व लाजिरवाणी आहे-खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना केले अवगत
कंझुमर फेडरेशन मार्फत देण्यात आलेल्या या पुरवठा कंत्राटात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून पालकमंत्री यशोमती ठाकूर या प्रथमदर्शनी दोषी असल्याचे खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांच्या लक्षात आणून दिले व या योजनेत केंद्र शासन आणि राज्य शासन यांचा प्रत्येकी 50% रकमेचा निधी समाविष्ट असतो आणि एकप्रकारे ही केंद्र शासनाची फसवणूक असून यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जातीने लक्ष घालावे व या महाघोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरपणे कार्यवाही करावी अशी मागणी खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी यावेळी केली.
मेळघाटातील अशिक्षित आदिवासी महिलांची फसवणूक एका महिला पालकमंत्री व महिला बालविकास कॅबिनेट मंत्र्यांच्या विभागात व गृह जिल्ह्यात होऊनही स्वतः महिला असणाऱ्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी याची साधी दखलही न घेणे म्हणजे भ्रष्टाचाराला खतपाणी देणे होय किंवा यांचा त्यात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे मत खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी यावेळी स्मृती इराणी यांचेकडे केले.
माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांचे सोबत आमदार रवी राणा व खासदार सौ नवनीत रवी राणा यांची एक तास चर्चा,महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती,विविध सामाजिक प्रश्न आदी अनुषंगाने साधक-बाधक चर्चा झाली.विशेष म्हणजे श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आजच्या दिल्लीतील व्यस्त दौऱ्यात आमदार रवी राणा पूर्णवेळ त्यांचेसोबत उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी केली महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर चर्चा,महाराष्ट्रात आलेला महापूर, अतीवृष्टी मुळे प्रचंड नुकसान झाल्याचे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले व केंद्राने महाराष्ट्रातील पुरपीडितांना भरीव मदत दयावी अशी मागणी केली.
महाराष्ट्राच्या या संकटसमयी अमितजी शाह यांनी तातडीने केंद्रातर्फे एन.डी.आर.एफ. चे बचाव पथक पाठविले ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचविले व केंद्राने तात्काळ 700 कोटींची मदत राज्याला दिली याबद्दल खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवि राणा यांनी अमितजी शाह यांचे आभार मानले.जर एन.डी.आर.एफ ची टीम वेळेवर पोहोचली नसती तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असते त्यामळे गृहमंत्रालयाने जी तातडीची पाऊले उचलली ते मदतकार्यात पूरक ठरल्याचेही खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी आवर्जून नमूद केले.
अमितजी शाह यांना सहकार खाते मिळल्याबद्दल खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी त्यांचे अभिनंदन केले, सहकारातील स्वाहाकार नष्ट करून सहकाराच्या नावावर स्वतःची दुकानदारी चालवून शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या संधीसाधू सहकार सम्राटांना धडा शिकवावा व सर्वसामान्य शेतकरी-शेतमजूर,भागधारक यांची फसवणूक होऊ नये तसेच शेतकऱयांना सहकार क्षेत्राचा जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी सहकार खात्याचे सहज-सुलभ व सरळ धोरण निर्माण करण्याची गरज असल्याचे व अमित शाह यांनी यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंतीही खासदार सौ नवनीत रवि राणा व आमदार रवी राणा यांनी केली.
महाराष्ट्रातील आघाडी सरकार हे सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत असून केंद्राने यात लक्ष घालून महाराष्ट्रातील जनतेला न्याय दयावा अशी मागणीही खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांनी यावेळी केली.
केंद्रीय गृह व सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी राणा दाम्पत्याचे म्हणणे शांततेने ऐकून घेऊन यावर गांभीर्याने विचार करून सकारात्मक पाऊले उचलण्याचे अभिवचन खासदार सौ नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा यांना दिले
अमरावती मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करावे ,जमीन अधिग्रहित झाली असून उर्वरित प्रक्रिया जलदगतीने राबवून तातडीने उभारणी कार्य प्रारंभ करावे-खासदार सौ नवनीत रवी राणा यांची मागणी
कोरोना काळात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करणार,यात सहभागी असणारयांची गय करू नका खासदार सौ नवनीत रवी राणा यांची मागणी
कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी व नागरिकांचे आरोग्य रक्षणासाठी जिल्ह्यात जम्बो कोविड सेंटर निर्माण करण्यात यावे तसेच नागरिकांच्या आरोग्य सुविधा व निदान आणि उपचारासाठी जिल्ह्यात केंद्र शासनाचे वतीने मोफत महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात यावे व सर्व प्रकारच्या रुग्णांना दिलासा द्यावा-खासदार सौ नवनीत रवी राणा यांचे निवेदन
मेळघाटच्या अतिदुर्गम भागातील आदिवासी नागरिकांच्या आरोग्यविषयक सुविधांसाठी मेळघाट व अंजनगाव सुर्जी,चुरणी,चिखलदरा आदी ठिकाणी मोबाईल हॉस्पिटल्स सुरु करावे,मेळघाट मध्ये सर्वसुविधायुक्त रुग्णवाहिका द्याव्या,तिवसा,चांदुर बाजार,अचलपूर-परतवाडा, अंजनगाव सुर्जी,दर्यापूर,धारणी, चिखलदरा,भातकुली आदी तालुक्यामधील आरोग्य यंत्रणेचे ऑडिट करून त्या ठिकाणी असणाऱ्या कमतरता दूर करून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसुविधा अल्पदरात व विनाविलंब मिळाव्या यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री श्री मनसुख मांडविया यांनी जातीने लक्ष घालावे खासदार सौ नवनित रवी राणा यांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना साकडे
कोरोना काळात आरोग्य यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगनमत करून शासकिय निधीचा गैररव्यवहार केला असल्याचे खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे लक्षात आणून दिले असता या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कार्यवाही करण्याचे वचन केंद्रीय आरोग्यमंत्री श्री मनसुख मांडविया यांनी खासदार सौ नवणीत रवी राणा यांना दिले.
केंद्रीय वने(फॉरेस्ट)पर्यावरण, कामगार कल्याण व रोजगार मंत्रो श्री भुपेंद्र यादव यांची खासदार सौ नवणीत रवी राणा यांनी भेट घेऊन केल्या विविध मागण्या
विदर्भाचे नंदनवन चिखलदरा येथील निर्माणाधिन स्कायवॉक वनविभाग व टायगर प्रोजेक्ट व पर्यावरण विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी अडकले असून यात केंद्रीय मंत्र्यानी तातडीने लक्ष घालून आडकाठी दूर करावी -खासदार सौ नवनीत रवी राणा यांची मागणी
अमरावती शहरातील श्रमजीवी नागरिकांची वस्ती असलेल्या संजय गांधी नगर क्र1,संजय गांधी नगर क्र.2,पंचशील नगर परिसरात गेल्या अनेक वर्षापासून रहात असलेल्या नागरिकांना वनविभागाच्या अडेलतट्टू धोरणामुळे मालकी हक्क मिळत नसल्याने केंद्रीय मंत्र्यांनी जातीने लक्ष घालून पर्यवरण व वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र द्यावे जेणेकरून या नागरिकांना जागेचे मालकी हक्क,पी आर कार्ड मिळेल-खासदार सौ नवणीत रवी राणा यांची मागणी
ताडोबा अभयारण्य च्या धर्तीवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा विकास करून पर्यटनाला चालना देण्यासाठी 500 कोटी ची मागणी
मेळघाटातील वनविभागाच्या सर्व विश्रामगृहांचे नूतनीकरण करून पर्यटकाना चांगल्या निवासव्यवस्था उपलब्ध व्हाव्या-खासदार सौ नवनीत रवी राणा यांची मागणी
अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार कल्याण मंडळाची सुसज्ज इमारत व्हावी ज्यात सांस्कृतिक भवन,वाचनालय, व्यायामशाळा,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,महिला रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र,आदी सुविधा असाव्यात, यासाठी प्रत्येक तालुक्यात कामगार कल्याण भवन निर्मितीसाठी तालुकानिहाय 5 कोटी रुपये देण्याची खासदार सौ नवनीत रवी राणा यांची कामगार कल्याण मंत्री भुपेंद्र यादव यांचेकडे आग्रही मागणी
अमरवती पंचतारांकित एमआयडीसी मध्ये काम करणारे कामगार,तसेच बांधकाम व इतर क्षेत्रात काम करणारे कुशल अकुशल,असंघटित कामगार यांच्या कल्याणार्थ केंद्र शासनाच्या विविध योजना प्रभावीणपणे राबविण्यात याव्या,ज्या आस्थापना, उद्योजक किंवा व्यावसायिक कामगार कल्याणाकडे दुर्लक्ष करतात त्यांचेवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी सुध्दा खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी केंद्रीय मंत्री भुपेंद्रजी यादव यांचेकडे केली.
चिखलदरा येथील वन विभाग व टायगर प्रोजेक्ट च्या हरकतीमुळे खडलेला स्कायवॉक निर्मितीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे असून केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री भुपेंद्र यादव यांनी यात जातीने लक्ष घालण्याचे अभिवचन दिल्याने आता लवकरच स्काय वॉक चे उर्वरित निर्माण कार्य सुरू होऊन चिखलदऱ्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळेल असे मत खासदार सौ नवनीत रवी राणा यांनी यावेळी व्यक्त केले.
पर्यावरण संवर्धनासाठी मातीच्या श्री गणेशमूर्ती स्थापित कराव्या, मूर्तिकार कुंभार बांधवांसोबत श्री गणेश मूर्ती घडविण्याची प्रक्रिया समजून घेतली व मूर्ती घडविण्याच्या प्रक्रियेत सहभाग घेतला,,अत्यंत मेहनतीने, सुबक -सुंदर गणेशमूर्ती श्रद्धापूर्वक तयार करून,कुंभार -मूर्तिकार बांधवांच्या वेदना जाणून घेतल्या,सर्व नागरिकांनी मातीच्याच मूर्ती घ्याव्या व प्लास्टर ऑफ पॅरिस च्या मूर्ती घेऊन पर्यावरणाच्या नाशाला हातभार लावू नये असे आवाहन यावेळी सर्व श्री गणेशभक्तांना केले.आतुरता श्री गणपतीबाप्पा च्या आगमनाची–शपथ घेऊ या पर्यावरण पूरक मातीचे गणपती स्थापनेची #गणपतीबाप्पामोरया