Eka Lagnachi Pudhchi Goshta अहाहाहाहा काय प्रसन्न आणि आनंद देणारा अनुभव, नाटक एका लग्नाची पुढची गोष्ट !
गोष्ट साधी, सरळ, गंमतशीर…आणि आमचा मित्र लेखक/दिग्दर्शक अद्वैत दादरकरने त्या गोष्टी मधला गोडवा जपत नाटकाची वीण किती घट्ट तरीही किती सुरेख गुंफली आहे!
ती परी अस्मानीची…
आणि
मला सांगा सुख म्हणजे…
ही दोन्ही गाणी प्रेक्षागृहात जे चैतन्य आणत ती अनुभवण्याची गोष्ट आहे.
प्रशांत दामले ह्यांना रंगमंचावर पाहणं ही केवळ ट्रीट आहे…असा देखणा, विनोदी गायक नट होणे नाही….एनर्जी चा धबधबा !
आणि कविता लाड…अबब…काय ग्रेस…काय टायमिंग ..सुंदर नटी आणि अतिसुंदर काम…
अतुल तोडणकरचे काम कमाल झाले आहे . हे ह्या तगड्या नटसंचात मिसळून त्यांना उत्तम साथ देतात…
नाटक साधं पण रंजक आहे .
आणि विशेष आनंद म्हणजे…माझ्या दोन मैत्रिणींबरोबर हे नाटक पाहिलं त्यामुळे आनंद द्विगुणित नाही तर त्रिगुणित झाला…
अशी ही ही अविस्मरणीय संध्याकाळ…निखळ आनंद आणि केवळ आनंद ! #natak #marathitheatre #marathiplay @damleprashant @kavitamedhekar ♥️