Gautami Deshpande Instagram – अजूनही विश्वास बसत नाहीये की गौतमीचं लग्न झालं… प्रत्येक गोष्टीमध्ये ताई हवी असणारी माझी बहीण स्वतःच्या संसाराला लागली… या क्षणी नक्की काय वाटतंय ते शब्दात सांगता येत नाहीये… आनंद..काळजी..आता ती officially दुसऱ्याची झाली याचं दुःख.. आणि तिच्या मनासारखा जोडीदार मिळाल्याचा आनंद.. सगळ्याच भावना एकत्र आल्या आहेत… काल परवा पर्यंत ताईचे शेपूट असणार आमचं बाळ ‘संसार’ करताना बघणं मजेचं असणार आहे.. यापुढे आम्हा बहिणींची gossips एकतर्फी नसतील 😁 आणि कदाचित तिचा संसार सुरू झाल्यावर ,”ताई तुला माझ्यासाठी वेळच नसतो..” ही तिची तक्रार संपेल… कारण..? तिचं तिलाच कळेल!
स्वानंद.. तुझं वेगळं स्वागत करण्याची गरज नाहीये… लग्नाआधीच तू फॅमिली मेंबर झाला होतासच… गौतमी स्वानंद ची काळजी घे… स्वानंद गौतमची साथ सोडू नकोस… संसार कोणाचाच सोपा नसतो.. पण एक दुसऱ्याचा हात घट्ट पकडलेला असला की कुठल्याही अडचणी वरती मात करता येते.. कदाचित सहज नाही… पण मात करता येते!! एकमेकांवर विश्वास असू द्या… संवाद असू द्या… नातं किंवा प्रेम असंच टिकत नाही त्यासाठी दोघांनीही कष्ट घेण्याची गरज असते… एकमेकांच्या प्रेमात पडण्याची नवीन कारणं शोधत रहा… एकमेकांना सांभाळून घ्या… आता फक्त तुम्ही दोघं नाही आहात दोन्ही कुटुंब एकत्र आली आहेत.. सगळ्यांची काळजी घ्या… आणि मी एवढं प्रेमाने बोलून सुद्धा, एवढं छान लिहून सुद्धा वेड्यासारखे वागलात, तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेवा!!!! लै हनीन 😁😁
.
.
.
#SwaG #lafdi
Wedding outfit styling –
@ketaki_ashish @stylebyk2
Aesthetics and Skincare @thefacestudio.in @_prajakta.kulkarni_
Phaotography – @sarrikaaaaaa @shoot_karnewala
Mrunmayee Wardrobe – @vastrarupamsilks
Hair – @snehakelkar906
Jewellery- @sorayaajewels_
Swapnil’s Wardrobe – @vaanis_official
Location- @wildernesthilltopresort | Posted on 26/Dec/2023 19:35:50