Shreya Bugde

Shreya Bugde Instagram – खरंतर “27” वर्षापूर्वी मी “बालकलाकार” म्हणून ह्या मनोरंजन क्षेत्रात आले आणि इथेच रमले. साधारण 21 वर्षापूर्वी ‘तुझ्याविना ‘ ह्या मालिकेच्या निमित्ताने मी zee परिवारात सामील झाले आणि टीव्हीचा उंबरठा ओलांडून तुमच्या घरात आले, तेंव्हां पासूनच आपलं नातं . नातं आपुलकीचं , प्रेमाचं आणि जबाबदारीचं…
होय जबाबदारीचं सुध्दा… कारण सांगते !
एकदा प्रेक्षकातल्या एक काकू सहज बोलता-बोलता म्हणाल्या “मला जर मुलगी झालीना तर तिचं नाव मी ‘श्रेयाच’ ठेवेन. तुझ्या सारखीच होऊदे पोर माझी”
मला एवढं “धस्स” झालं होत त्या दिवशी, बापरे !
पुढे त्या काकूंना “श्रेया” झाली का “श्रेयस” ते काही मला कळलं नाही पण माझी मात्र जबाबदारी वाढली कारण अश्याच काही काकू, काका, दादा, ताईंची चिमुरडी घेऊन पुन्हा एकदा टीव्हीचा उंबरठा ओलांडून मी तुमच्या घरी येतेय! !
आजपासून सुरु होणाऱ्या ‘ड्रामा जुनिअरस ‘ ह्या शो चं सूत्रसंचालन मी करणार आहे. …पुन्हा एक नवीन प्रवास सुरु करणार आहे.
झी मराठी आणि मी आमच्या ह्या जोडीला तुम्ही कायम खूप प्रेम आणि यश दिलत, ह्या नवीन प्रवासात आमच्या सोबत जोडलेल्या सगळ्यांना पण तसंच भरभरून प्रेम द्याल ह्याची खात्री आहे.
आज पासून आम्ही येतोय आमच्या गँग सोबत. …
भेटू मग आज आणि उद्या रात्री 9-10वा ❤️

ड्रामा जुनिअरस
शनिवार -रविवार
रात्री ९ -१0 वा
तुमच्या माझ्या नात्याची विण आणखी घट्ट होऊदे !❤️ | Posted on 22/Jun/2024 15:20:50

Shreya Bugde
Shreya Bugde

Check out the latest gallery of Shreya Bugde