Sushant Shelar

Sushant Shelar Instagram – ‘लाडकी बहीण’साठी आता फक्त ‘या’ कागदपत्रांची गरज, तहसील कार्यालयात जायची गरज नाही…मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
‘लाडकी बहीण’साठी आता फक्त ‘या’ कागदपत्रांची गरज, तहसील कार्यालयात जायची गरज नाही…महाराष्ट्रात सध्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे. या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्रांच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या. पण कागदपत्रे बनवण्यासाठी राज्यभरात तहसील कार्यालयांवरील गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे. ज्या महिलांकडे डोमिसाइल म्हणजे अधिवासी दाखला नाही त्या महिलेकडे 15 वर्षांपूर्वीचं रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला यापैकी एकही कागदपत्र राहिलं तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच या योजनेसाठी राज्य सरकारने 15 जुलै ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती. पण राज्य सरकारने ही मुदत दोन महिन्यांनी वाढवली आहे. याचाच अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकणार आहेत. राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जायची गरज नाही हे स्पष्ट झालं आहे.
.
.
#EknathShinde #एकनाथशिंदे #CMOMaharashtra #माझीलाडकीबहीण #majhiladkibahin #Yojana #womenrights
#शिंदे_सरकार
#महाराष्ट्रातील_सुवर्णयोग
#जनतेचामुख्यमंत्री
#शिवसेना
#शिवचित्रपटसेना
.
.
#sushantshelar
#Shivsena #शिवसेना | Posted on 03/Jul/2024 12:05:42

Sushant Shelar
Sushant Shelar

Check out the latest gallery of Sushant Shelar