Sushant Shelar Instagram – अभिनेता सुशांत शेलार यांची सामाजिक बांधिलकी
पडद्यामागच्या कलाकारांसाठी छत्रीची भेट
आपल्या सामाजिक कार्यातून वेगवेगळे उपक्रम राबविणारा व सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारा अभिनेता व कार्यकर्ता म्हणून सुशांत शेलार यांची ओळख आहे. विविध सामाजिक कामात कायम अग्रेसर असणाऱ्या सुशांत यांनी करोनाचा काळ असो अथवा चिपळूणची पूर परिस्थिती गरज असेल त्याला आपल्यापरीने मदतीचा हात दिला आहे. ‘चिरायू’च्या माध्यमातूनही त्यांनी पडद्यामागच्या अनेक कलावंतांचा सन्मान, मनोरंजन सृष्टीतील कलाकारांसाठी मराठी बॉक्स क्रिकेट लीग, वैद्यकीय मदत असे अनेक उपक्रम सुशांत यांनी राबविले आहेत.
#sushantshelar #socialwork #umbrelladist | Posted on 02/Jul/2024 19:30:52