Sushant Shelar Instagram – आदरणीय लता वहिनी,
ठाण्यातल्या आणि आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकाचं मायेचं ठिकाण. आदरणीय #मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब साताऱ्याहून ठाण्याला आले. रिक्षा चालवण्यापासून अनेक व्यवसाय केले. वंदनीय #बाळासाहेब_ठाकरे आणि #धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीत समाजकारणाचे धडे गिरवत राजकारणात प्रवेश केला आणि नगरसेवक पदापासून आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले आहेत.
दरम्यानच्या काळात अनेक चढ-उतार त्यांच्या सामाजिक वैयक्तिक आयुष्यात आले पण या सगळ्यातून ते सही सलामत बाहेर पडू शकले याचं कारण वहिनी, आमच्या लता वहिनी. अतिशय खंबीर साहेबांच्या पाठीमागे त्या कायमच उभ्या राहिल्या संसारिक जबाबदाऱ्या सगळ्या एकटीने पार पाडल्या त्यामुळेच साहेब समाजाचे होऊ शकले. #शिंदे कुटुंबाचं ठाण्यातलं घर म्हणजे कार्यकर्त्यांसाठी कधीही जाऊन थांबण्याचं हक्काचं ठिकाण बनू शकलं ते केवळ वहिनींमुळे आणि येणाऱ्या जाणाऱ्याची काळजी घेणाऱ्या वहिनी श्रीकांतच्या शिक्षणाची काळजी करणाऱ्या वहिनी त्याच्यावर #संस्कार करणाऱ्या वहिनी साहेबांच्या अत्यंत व्यस्त दिनचर्येत कोणतीही तक्रार न करता त्यांच्या प्रत्येक कृतीला पाठिंबा देणाऱ्या वहिनी या खरंच साहेबांच्या अर्धांगिनी आहेत. आजच्या वाढदिवशी परमेश्वर त्यांच्यावर सुख समाधान समृद्धीची बरसात करो अशी मनोमन 🙏प्रार्थना आणि सौ वहिनींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक 💐शुभेच्छा….
.
.
#lataeknathshinde #वाढदिवस #हार्दिक_शुभेच्छा #EknathShinde #DrShrikantShinde #nareshmhaske #कार्यकर्ता_धनुष्यबाणाचा
#shivsenamaharashtra #ShivsenaThane #happybirthday #thane #cmwife
#शिंदे_सरकार
#महाराष्ट्रातील_सुवर्णयोग
#जनतेचामुख्यमंत्री
#शिवसेना
#शिवचित्रपटसेना
.
.
#SushantShelar
#Shivsena #शिवसेना | Posted on 11/Jul/2024 11:52:21
Check out the latest gallery of Sushant Shelar



