Tejaswini Pandit Instagram – प्रिय राजसाहेब
हेवा वाटतो तुमचा, तुमच्या मराठी आणि महाराष्ट्रवरच्या प्रेमाचा.
इतका निस्वार्थी भावना असणारा, आणि इतरांसाठी जगणारा माणूस क्वचितच सापडतो आता !
साहेब तुमच्या राजकारणाविषयी , तुम्ही घेतलेल्या भूमिकेंविषयी लोकांचं काय म्हणणं आहे याच्याशी मला काही घेणंदेण पण नाही ,
किंबहुना “तुम्हाला जाणलेल्या” कुठल्याच व्यक्तीच्या मनातलं तुमच्याविषयीचं प्रेम त्यामुळे तसूभरही कमी होऊ शकत नाही, हेच तुम्ही कमावलं आहे.
तुम्ही तुमच्या ध्यासाच्या आणि स्वप्नाच्या दिशेने चालत रहा !
आमचा तुम्हाला आणि तुमच्या विचारांना बिनशर्त पाठिंबा आहे 🙏🏼
मनासारखा राजा आणि राजासारखं मन !
हसत रहा साहेब 🩷
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
#rajsahebthackeray #vadhdivsachya_hardik_subhechha | Posted on 14/Jun/2024 18:00:08