Mrunmayee Deshpande

Mrunmayee Deshpande Instagram – माझ्या जवळची जी कोणी माणसं आहेत त्या सगळ्यांना ठाऊक आहे की या प्राण्याची, माझ्या आयुष्यात किती दहशत आहे.

माझ्या आयुष्याची २७ वर्ष,
“अगं तो काही करत नाही,
अगं तो फ्रेंडली आहे,
अगं तू ओव्हररिअॅक्ट करू नको,
अगं तो पाळलेला आहे…”
ही वाक्य ऐकण्यात आणि प्रोसेस करण्यात गेलीयेत.
या सगळ्यात मला आजवर, एकतर स्वतःचा तरी राग आलाय.. किंवा समोरच्या, “समजावणाऱ्या” पण समजून न घेणाऱ्या लोकांचा तरी.

But let me tell you one thing,
त्या प्राण्याचा कधी राग आलेला नाही बरं.. Infact, Contradiction असं की,
माझ्या इन्स्टाग्रामच्या Algorithmला तर
असं वाटतं की माझ्याकडेही एखादा टॉमी असावा.
माझ्या वॉलवर जगभरातल्या टॉम्यांचे, त्यांच्या पिल्लांचे रिल्स सतत सजेशनमध्ये येत असतात.
बरं, एवढच नाही.. पेट ग्रूमिंगसाठी कोणता शॅम्पू वापरतात हे ही कधीकधी मला उगाच माहित असतं.

पण माझ्या इन्स्टाग्रामच्या Algorithmला हे कोण सांगणार? की,
हे प्रेम कमी.. त्या प्राण्याविषयी वाटणारी भिती जास्त आहे,
त्या प्राण्याचे Reels पाहण्यात
Relatability कमी Manifestation जास्त आहे.
त्या प्राण्याबद्दल कुतूहल वाटणं कमी, हतबल होणं जास्त आहे..

कोणाकडेही पहिल्यांदा जायचं म्हटलं की “तुमच्या घरी कुत्रा तर नाहीये ना” असं विचारणारी मी, त्यादिवशी मृण्मयी ताईला मात्र हा प्रश्न विचारायची विसरले आणि पुढे जे घडलं ते तुमच्या समोर आहे.

व्हिडीओतला कार्बन पहिला आहे, ज्याच्या डोळ्यात मला,
तो माझ्याकडे बघत असताना बघता आलंय.
व्हिडीओतला कार्बन पहिला आहे, ज्याच्या डोक्यावरून हात फिरवण्यापर्यंत नाही पण निदान पाठीवरून हात फिरवण्यापर्यंत तरी मला पोचता आलंय.
व्हिडिओतला कार्बन पहिला आहे, ज्याच्या प्रेमाला.. थरथरत्या हातांनी का होईना, मला उत्तर देता आलंय.

पोटात गोळा, हातात कापरं, डोळ्यात अश्रू..
पण मनात भितीपेक्षा जास्त प्रेम मला फायनली अनुभवता आलंय.

तुम्हा सगळ्यांसाठी हा व्हिडिओ इमोशनल असेल कदाचित,
पण माझ्यासाठी हा व्हिडीओ कम्फर्टिंग जास्त आहे.

यापुढेही, माझी भिती किती कमी होईल मला माहित नाही.
पण या प्राण्याविषयी वाटणारं प्रेम कधी कमी होणार नाही. हे मात्र खरं.

थँक यू मृण्मयी ताई आणि स्वप्नील दादा..
थँक यू कार्बन.. आणि तुला सॉरी सुद्धा..♥️ | Posted on 07/Feb/2025 18:41:53

Mrunmayee Deshpande
Mrunmayee Deshpande

Check out the latest gallery of Mrunmayee Deshpande