Prajakta Mali

Prajakta Mali Instagram – तुम्ही होता; म्हणून आज आम्ही सुखानं हिंदवी स्वराज्यात जगतोय.
आणि होय..,
तुम्ही आहात आणि राहणारच; आमच्या जगण्यात, आमच्या श्वासात, आमच्या रंध्रारंध्रात.. शेवटच्या श्वासापर्यंत.. 🚩
तुमच्या आचार-विचारांचा वारसा पुढे नेऊ..
हीच प्रतिज्ञा…
.
#मुजराराजं 🙏
#जयभवानीजयशिवाजी
#अभिमान #श्वास #आदर #हिंदवीस्वराज्य #राजा#जाणताराजा #सनातनधर्म #सह्याद्रीचीलेक
.
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी

नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती
पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी

यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत
पुण्यवंत, नीतीवंत, जाणता राजा

आचार शील, विचारशील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सकळांठायी

धीर उदार गंभीर, शूर क्रियेसी तत्पर
सावधपणे नृपवर, तुच्छ केले

देव धर्म गोब्राम्हण, करावया संरक्षण
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली

या भूमंडळाचे ठायी, धर्मरक्षी ऐसा नाही
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणे

कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला
कित्येकांस आश्रय जाहला, शिवकल्याण राजा।।
श्री समर्थ रामदास स्वामी🚩🚩🚩

राजराजेश्वर हिंदूपदपातशाह गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा 🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩 | Posted on 19/Feb/2025 14:06:03

Prajakta Mali
Prajakta Mali

Check out the latest gallery of Prajakta Mali