Priya Bapat Instagram – “जर तर” ची गोष्ट चा २०० वा प्रयोग
उत्तम प्रयोग सादर करण्यासाठी २५/३० जणांची backstage टीम नेहमीच मेहनत घेत असते. आज याच टीम मधे आमचे मॅनेजर, ड्राइव्हर काका,कलाकार सगळे तर सहभागी झालेच पण प्रेक्षकांनीही मदतीचा हात पुढे केला.
आधीचा कार्यक्रम उशिरा संपल्याने आमच्या टीमला सेट उभारण्यासाठी वेळच नाही मिळाला. बाहेर प्रेक्षक खोळंबले होते. शेवटी नाट्यगृह स्वच्छ झाल्याक्षणी प्रेक्षकांना आत सोडंल आणि त्यांच्या साक्षीने अवघ्या २५ मिनटात अख्खा सेट उभा केला आमच्या टीमने!
२०० व्या प्रयोगाला खरी रंगत आणली या सुजाण, समजुतदार आणि भन्नाट प्रेक्षकांनी. तुमच्या प्रेमामुळे हे नाटक यशस्वी झालंय. अजून खूऽऽऽऽऽप प्रयोग करायचे आहेत. असंच प्रेम असू द्या. मनोरंजन करत राहू.
या प्रयोगाला या कमाऽऽल प्रेक्षकांना प्रयोगानंतर भेटू शकलो नाही याची खंत आहे. पण पुणेकर लवकरच भेटू ♥️ | Posted on 06/Feb/2025 09:30:00