Shreya Bugde

Shreya Bugde Instagram – मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित ‘झी चित्र गौरव २०२५’ गौरव सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, झी गौरव पुरस्काराच्या २५ वर्षांचा समृद्ध इतिहासासह, यावेळी मराठी चित्रपट जगतातील तंत्रज्ञ, कलाकार, दिग्दर्शक, निर्माते आणि इतर प्रतिभावान व्यक्तींच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. झी चित्र गौरव पुरस्कार २०२५ सोहळ्यात प्रेक्षकांसाठी काय खास सरप्राइजेस असणार चला जाणून घेऊया.

झी चित्र गौरव २५ या वर्षीच्या सोहळ्यात रितेश देशमुखला एक सरप्राईझ दिलं जाणार आहे. रितेश देशमुख ह्यांचे त्यांच्या वडिलांसोबत म्हणजेच स्व. श्री विलासराव देशमुख यांच्यासोबत असलेल्या घनिष्ठ नातेसंबंधावर प्रकाश टाकणारं पत्रवाचन होणार आहे. ज्यात रितेशच्या कामगिरीबद्दल वडिलांकडून अभिमान आणि कौतुक व्यक्त होणार आहे. सोबतच या मंचावर साजरं होणार आहे श्रीवल्लीचं डोहाळे जेवण यात सुप्रिया आणि सचिन पिळगावकर देणार आहेत श्रीवल्लीला शुभाशीर्वाद. तर श्रेयस आणि पुष्पाची खास भेट आणि त्यांच्यात झालेला तो संवाद तुमच्या मनोरंजनाला चारचांद लावणार आहे.

त्यासोबत एका हॉरर-कॉमेडी ॲक्टमध्ये, वैदेही परशुरामी आणि सिद्धार्थ जाधव याचं एक खास सादरीकरण होणार आहे.

या गौरव सोहळयात प्राजक्ता माळी आणि गौतमी देशपांडे यांचा एक अद्वितीय नृत्य अनुभवता येणार आहे. सोनाली कुलकर्णी, निवेदिता सराफ यांना त्यांच्या अभिनयाच्या प्रवासासाठी एक खास ट्रिब्युट देणार आहे. अभिनेत्री ते पत्नी, आई असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास आणि रुपेरी पडद्यावर त्यांचे उल्लेखनीय पुनरागमन यावर हा ऍक्ट आधारित असेल. निवेदिता ताईंचे जवळचे मित्र सचिन आणि सुप्रिया, त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन निवेदिता जोशी-सराफ यांचा गौरव करतील.

‘झी चित्र गौरव २०२५’ पुरस्काराच्या अविस्मरणीय क्षणांचे आणि दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार व्हा. ८ मार्च रोजी संध्या. ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

#ZeeChitraGaurav2025 #ZeeChitraGaurav
#ZeeMarathi #MiMarathi #SuperExclusive
#Latestupdates #FollowUs | Posted on 05/Mar/2025 12:33:55

Shreya Bugde
Shreya Bugde

Check out the latest gallery of Shreya Bugde